पारनेर /नगर -१२/६/२३
महापुरुषांच्या अपमानाच्या पोस्टमध्ये वारंवार भर पडताना पाहायला मिळते
आणि म्हणून सोशल मीडियाचा वापर केला जात असतो
सोशल मीडियाचा उपयोग चांगल्या गोष्टी दर्जेदार विषय यावर मंथन करण्याऐवजी महापुरुषांची विटंबना त्यांचा अपमान करण्यावरतीच काही समाजकंटक भर देताना दिसत आहे
पुन्हा एका घटनेत भर घातली आहे ती आहे पारनेर तालुक्यातील
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुद्धा वाचा ..
बापरे… रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तुटलं मुलीचं लग्न… वर पित्याने दिले हे कारण ! – MDTV NEWS
सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एका व्हिडिओवर एक आक्षेपार्ह कमेंट केलीय
त्यामुळे अहमदनगरच्या पारनेर मध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले
याप्रकरणी वसीम सय्यद या युवकावर गुन्हा नोंदवण्यात आलाय
त्यामुळे आज पारनेर तालुक्यात बंद पुकारण्यात आलाय
याबाबत रविवारी रात्री पारनेर पोलिसांना बंदचे निवेदन देण्यात आले होते
त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर बळी पडू नये बंदच्या काळात पारनेरवासीयांनी बाहेर पडू नये असा आवाहन पारनेर पोलिसांकडून करण्यात आलंय
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो, पारनेर, जिल्हा नगर