.. अपघातग्रस्तांसाठी ठरणार ट्रामा केअर सेंटर नवसंजीवनी

0
176

नंदुरबार : दि.१०/०२/२०२३

पालकमंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नवापुरात नुकतच ट्रामा केअर सेंटरच लोकार्पण पार पडलं.

WhatsApp Image 2023 02 10 at 16.17.31
आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ .विजयकुमार गावित सेंटरच लोकार्पण करतांना
WhatsApp Image 2023 02 10 at 16.17.30 1

” नवापूर येथील अत्याधुनिक ड्रामा केअर सेंटरमुळे अपघातग्रस्तांना त्वरित उपचार मिळण्यास मदत होईल असं प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलं.”

पालकमंत्री डॉक्टर गावित यांच्या हस्ते या सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं. केअर सेंटर चा उपयोग भविष्यात अपघात ग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी होईल, त्यांना त्वरित वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले जातील त्यामुळे केअर सेंटर हे अपघात ग्रस्तांसाठी नवसंजीवनी ठरेल असा आशावाद डॉक्टर गावित यांनी व्यक्त केलाय..

असे आहे ट्रामा केअर सेंटर

नवापूर उपजिल्हा रुग्णालय परिसरात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांसह केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात 20 खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी अपघात विभाग ,एक्स-रे विभाग, सोनोग्राफी विभाग ऑपरेशन थेटर, आयसीयू विभाग अशा सुविधा आहेत.आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ .विजयकुमार गावित यांच्यासह मान्यवरांनी सेन्टरची पाहणी केली आणि माहिती जाणून घेतली ..

WhatsApp Image 2023 02 10 at 16.17.32 1
1
WhatsApp Image 2023 02 10 at 16.17.32 2
2

केअर सेंटरच्या या सुसज्ज इमारतीचा लाभ नागरिकांना मिळेल.

यावेळी व्यासपीठावर नंदुरबारच्या खासदार डॉक्टर हिना गावित ,जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित ,आमदार आमशा पाडवी, जिल्हा परिषद सदस्य भरत गावित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे, डॉक्टर राजेश वसावे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, नगरपालिका मुख्याधिकारी स्वप्निल मुधलवाडकर , यांच्यासह नगरसेवक ,माजी नगराध्यक्ष लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नंदुरबारहुन प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी एम डी टीव्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here