TREE PLANTATION:वृक्षदिंडी तुन दिला विद्यार्थ्यांनी ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे ‘संदेश..

0
414

तळोदा :-

माध्यमिक विद्यालय तुळाजा ता तळोदा येथे मुख्याध्यापक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनाने वृक्षदींडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला सरपंच मीराताई रहासे,उपसरपंच संदीप खर्डे,सदस्य विक्रम डूमकुल लक्ष्मण पाडवी,सचिन राहासे,सीताराम राहसे पोलीस पाटील रतीलाल डूमकुल तसेच आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी नंदुरबार येथील कार्यालयीन अधीक्षक वसंत पाटील हे उपस्थित होते.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सर्व मान्यवरांनी पालखीचे पूजन केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.. या प्रसंगी वसंत पाटील यांनी ‘ वृक्ष वल्ली आम्हा सोयरे ‘ या विषयी मार्गदर्शन केले व प्रत्येक विद्यार्थ्याने झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन केले
.मान्यवरांच्या हस्ते शाळेचा आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी गावात दिंडीचा माध्यमातून घोषणा देत जनजागृती केली.त्यानंतर शालेय पोषण आहारात पूरक आहार म्हणून विद्यार्थांना राजगिरा लाडू देण्यात आले.वसंत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संवाद साधुन गुणवत्ताविषयी समाधान व्यक्त केले. सूत्रसंचलन अशोक महाले यांनी केले तर आभार श्री पंकज खेडकर यांनी मानले या कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा प्रतिनिधी …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here