अमर रहे ! गुढे गावचे भूमिपुत्र राहुल माळी शहीद …

0
604

गुढे गावावर शोककळा..

गुढे /भडगाव -३०/६/२३

येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलात (Indian Army) नायक पदावर कार्यरत असलेले जवान राहुल श्रावण माळी (३४) हे भारत – बांगलादेश सीमेजवळ (India – Bangladesh border) पश्र्चिम बंगाल (West Bengal) येथील कंचनपुरा येथे दि.२७ देशसेवा बजावत असताना शहीद झाले त्यांच्या आकस्मित दु:खद घटनेने माळी परिवारावर मोठा आघात झाला असून यामुळे गावावर शोककळा पसरल्याने गुढे गावासह परिसरात या वीर शहीद जवानाबाबत दु:ख व्यक्त केले जात आहे.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्री संत सावता महाराज पंच कमिटीचे सदस्य श्रावण श्रीधर माळी यांचे सर्वात लहान चिरंजीव राहुल श्रावण माळी हे १४ वर्षापूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाले होते ते आता पश्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे नायक पदावर सेवा बजावत असताना दि.२७ रोजी रात्री शहिद झाले. ते कुंटुबासह आर्मी सेंटर मध्ये वास्तव्यास होते बराकपूर येथील आर्मी हॉस्पीटल येथे आज शवविच्छेदन करून त्यांचे पार्थिव शरीर आज नातेवाईक यांच्या ताब्यात दिल्यानंतर ते गुढे मुळ गावी शुक्रवारी रात्री आणण्यात आले ..
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, शिव वय वर्ष ४ व शंभु वय दीड वर्ष अशी लहान चिमुकले मुले आहेत. वडील, आई व दोन मोठे भाऊ वहिनी, पुतणे असा परिवार असून ते प्राथमिक शिक्षक अविनाश माळी यांचे लहान बंधू आहेत त्यांचा शासकीय इंतमामात गुढे जुवार्डी फाट्यवर मोठ्या जागेवर अंत्यसंस्कार करण्यात आला .. यावेळी गावात दुःखाचे सावट पसरले होते ..
एम डी टी व्ही न्यूज परिवाराकडून या वीरपुत्रास अखेरचा सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली !!
सतीश पाटील ,भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here