शिंदखेडा – येथील तहसील कार्यालयासमोर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ डॉ बाबासाहेबांना जयंती उत्सव समितीच्या वतीने ऐतिहासिक, वैचारिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून सामुहिक बुद्ध वंदना देण्यात आली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने शालेय स्तरावर चित्रकला, निबंध, वत्कृत्व, प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रा.पंढरीनाथ पाटील यांचे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील व्याख्यान झाले. राहुल पाटोळे यांनी भारताचे संविधान या शंभर पुस्तकाचे वाटप केले.
यावेळी शहरातील माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला.
तसेच राष्ट्रीय संयसेवक संघाच्या वतीने बुद्धवंदना करुन शहरात विविध ठिकाणी व काॅलनी परिसरात जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, पोलीस निरीक्षक सुनील भाबड, गटनेते अनिल वानखेडे, काॅग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, माजी सभापती प्रा.सुरेश देसले, माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, माजी नगराध्यक्ष दिपक देसले, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, सचिव प्रा. निरंजन वेंदे, नानाभाऊ पाटोळे, अमृत पाटोळे, अँड.अरविंदकुमार मंगासे , अँड.चंद्रकांत बैसाणे यांच्यासह पदाधिकारी व शहरातील नागरिक व महिला उपस्थित होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय पाटोळे, उपाध्यक्ष प्रा. मधुकर मंगळे, प्रा.सारनाथ बोरसे, पप्पू अहिरे, खजिनदार विनोद पाटोळे, शशीकांत बैसाणे, प्रा. सुनील थोरात, विजय मोरे, राहुल पाटोळे, संजय ढिवरे,प्रकाश नगराळे, राहुल महिरे, कमलेश पाटोळे, भुषण नगराळे, मंगलप्रसाद पाटोळे, सिद्धार्थ बोरसे, दगा मंगळे, हर्षदीप वेंदे,अजय पानपाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
यादवराव सावंत, एम.डी.टी.व्ही. न्युज शिंदखेडा