निमित्त होतं रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचं.. या निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं.

आनंदी भंते, जयपाल सिंग रावल सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, राहुल पाटील शरद गवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा उद्घाटन करण्यात आलं.. यावेळी 25 रक्तदात्यांनी रक्तदान केलं.. या संपूर्ण कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष राहुल शिरसाठ संतोष गवळे व जय भीम मित्र परिवारांने परिश्रम घेतले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गवळी यांनी केलं होतं.
या उपक्रमाच्या माध्यमातून रमाबाई आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली.
सारंगखेडाहून गणेश कुवर ग्रामीण प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज..