नंदुरबारात दोघांना मारहाण

0
148

नंदुरबार : शहरातील जगतापवाडीत दोघांना मारहाण केल्याप्रकरणी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील बापूजी नगरातील अभिषेक कैलास मोरे व त्याचा आत्याचा मुलगा निलेश भाऊसाहेब आजगे हे जगतापवाडी येथे मेसचे जेवण घेवून लग्न मंडपाजवळून जात होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

याचे वाईट वाटून अभिषेक मोरे व निलेश आजगे यांना १२ जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच खुर्चीने अभिषेक मोरे यांच्या पाठीवर, हातावर, डोक्यावर व पोटावर मारुन दुखापत केली.

याबाबत अभिषेक मोरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात १३ जणांविरोधात भादंवि कलम ३२४, १४३, १४७, १४९, ५०४, महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रविंद्र पवार करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here