अट्टल दुचाकी चोरटा जेरबंद,दीड लाखांच्या पाच दुचाकी जप्त

0
1829
two-wheeler thief jailed

शहादा तालुक्यातील दुचाकी चोरट्याना शहादा पोलिसांनी जेरबंद केले असून,त्याच्या ताब्यातून एक लाख ५२ हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आठ दिवसांपूर्वीच टोळीकडून १५ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या होत्या.

download

दरम्यान, गेल्या आठवड्यात शहादा पोलिसांनी मोटारसायकली चोरणाऱ्या एक टोळीला अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून १५ मोटारसायकली जप्त केल्या होत्या. मात्र, यातील प्रमुख सूत्रधार हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
शहादा पोलिसांना मार्फत मिळालेली माहितीनुसार, शहादा तालुक्यातील दूधखेडा येथे राहणारा गणेश पांडू पवार (वय ३५) हा मोटारसायकल चोरी करत होता. शहर व परिसरात त्याने अनेक मोटारसायकल चोरी केल्या असल्याचे समजले. पथकाने त्याच्यावर पाळत ठेवून त्याला डोंगरगाव रस्त्यावर सापळा रचून ताब्यात घेतले. त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातील पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. शहादासह नंदुरबार शिरपूर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हे
दाखल आहेत.

सदरील कारवाई पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक छगन चव्हाण, जमादार प्रदीपसिंग राजपूत हवालदार योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी, किरण पावरा, दिनकर चव्हाण, भरत उगले, अजय चौधरी यांनी केली आहे. संशयिताकडून आणखी काही गुन्हे उघडकीस , येण्याची शक्यता असल्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सांगितले.
संजय मोहीते शहादा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here