उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का, पोलिसांनी घेतले ताब्यात..

0
211

मुंबई /नागपूर-२०/४/२३

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh)यांच्यावर नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) कारवाई केली आहे.

आमदार देशमुख यांनी पाणीप्रश्नावर ‘अकोला ते नागपूर’ जल यात्रा काढली होती.

मात्र, नागपूर पोलिसांनी आमदार देशमुख यांना नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरच ताब्यात घेतलं आहे.

आमदार देखमुख हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नागपूर येथील निवासस्थानी खारपान पट्ट्यातील क्षारयुक्त पाणी टँकरने घेऊन जात असताना त्यांच्यावर धामणा परिसरात कारवाई करण्यात आल्याचं समजते.

विदर्भातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस कठीण होत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

नागरिकांना पिण्याच्या पाण्याची आबाळ असताना सरकार त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

अशातच पाणीप्रश्नावर ‘अकोला ते नागपूर’ जल यात्रा काढणारे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांना धामणा परिसरात नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) ताब्यात घेतलं आहे.

आमदार देशमुख हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटातील आहेत.

दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. हे सरकार जनतेलाच घाबरु लागले, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे .

नितीन देशमुख यांच्या ‘जल यात्रे’ला नागपूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

असे असतानाही यात्रा काढण्यात आली. मात्र, आता देशमुखांना ताब्यात घेण्यात आले आहे. अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदार संघामधील 69 खेडी योजनेवरील स्थगिती उठवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

त्यासाठी नितीन देशमुख यांनी आपल्या समर्थकांसोबत अकोला ते नागपूर पायदळ यात्रा काढली. खारपान पट्ट्यातील खारं पाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंघोळ घालण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती.

देशमुखांना आता ताब्यात घेतल्यानं राऊतांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

बाळापूर आणि अकाेला तालुक्यातील खारपाणपट्यातील गावांसाठी अणाऱ्या 69 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेला सरकारने स्थगिती दिली आहे.

याच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली.

दरम्यान, त्यांची ही यात्रा नागपूर येथे रोखण्यात आली आहे. 

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई/नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here