लोक स्वताहून येतात ठाकरे यांच्या सभेचे वैशिष्ट्य : जयंत पाटील..

0
170

नंदुरबार :२७/३/२३

सरकार उद्धव ठाकरे व विरोधकांवर टीका करण्यातच वेळ घालवीत असून अवकाळी नुकसानीची घोषणा न करता सरकारने शेतकऱ्यांची घोर निराशा केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नंदुरबारात केला.ते नंदुरबार दौऱयावर होते ..

त्यावेळी ते बोलत होते ..

अधिवेशन सुरू असताना किमान शेवटच्या दिवशी तरी महाराष्ट्र सरकार अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देईल, तशी घोषणा होईल अशी अपेक्षा होती.

मात्र विरोधक आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्यापलीकडे सत्ताधाऱ्यांच्या भाषणातून काही मिळाले नाही, अशी टिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. उद्धव ठाकरे यांच्या सभांना लोकांना ओढून आणावे लागत नाही.

ते स्वत:हून येतात, हे त्यांच्या सभेचे वैशिष्ट्ये असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

शहादा येथे राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीसाठी आलेले पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधताना राहुल गांधींवर झालेली कारवाई म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु झाल्याची प्रक्रिया असल्याचे सांगितले.विधानसभेबाहेर गांधी यांच्या प्रतिमेस भाजप आमदारांनी चप्पलने मारणे ही कृती बरोबर नाही.

या कृतीविषयी कारवाईची सभागृहात मागणी केली.

मात्र सत्तेत बसलेले कसे वागतात हे सर्व बघत असल्याचे पाटील यांनी सांगितले. ऐकू या नेमकं काय म्हणाले जयंत पाटील ..
दरम्यान, पाटील यांनी शिंदे गटात असलेल्या चंद्रकांत रघुवंशी यांच्या ताब्यातील नगरपालिका नूतन इमारतीची पाहणी केली.

2 4
01
3 2
2

यावेळी श्री रघुवंशी यांनी त्यांना माहिती दिली.यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, जि प उपाध्यक्ष सुहास नाईक उपस्थित होते..
जीवन पाटील,कार्यकारी संपादक,एम डी टी व्ही न्यूज,नंदुरबार .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here