नेमसुशील विद्या मंदिरात अनोख्या पद्धतीने साजरा झाला व्हॅलेंटाईन डे..

0
121

तळोदा,नंदुरबार :१६/२/२३

शॉर्ट हेडलाईन
1 तळोदा येथील नेम सुशील विद्या मंदिरात साजरा झाला व्हॅलेंटाईन डे अनोख्या पद्धतीने
2 मातृ पितृ दिवस साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये रुजवली प्रेमाची भावना
3 भारतीय संस्कृतीचे घडवलं शाळेने दर्शन..

सध्या पाश्चिमात्य संस्कृतीचा अंधानूकरण मोठ्या प्रमाणावर होत असून शाळा महाविद्यालयांमध्ये याची रेलचेल कायम पाहावयास मिळते. मात्र तळोदा येथील नेम सुशील विद्या मंदिर याला अपवाद ठरलं..

हि पहा सविस्तर बातमी https://youtu.be/rLkZxJ8XnAA

सध्या शाळा असो का महाविद्यालय डे संस्कृतीने आता डोकं वर काढलंय.. डे संस्कृतीने महाविद्यालयांसोबत शाळेतील विद्यार्थ्यांना देखील भुरळ घातली आहे..

परंतु जगात भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे याविषयी आदर्श घालून दिला तळोदा येथील या शाळेनं.. चक्क 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे हा दिवस मातृ-पितृ दिन म्हणून साजरा केला..

एकीकडे याच दिवशी 2019 मध्ये पुलवामात भारतीय जवानांवर हल्ला झाला तेव्हापासून हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो तर दुसरीकडे प्रेमाचा दिवस म्हणून विद्यार्थी आणि तरुणाई बेभानपणे वागतात..

त्या तरुणाईला चपराक देण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीची खरी ओळख करून देण्यासाठी तळोद्यातील शाळेत मातृ पितृ दिनाच्या माध्यमातून आपल्या आईवडिलांप्रती प्रेम भाव व कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची संधी मिळाली.

या शाळेतील पालक दिनेश मराठे, डॉक्टर योगेश बडगुजर, गणेश मराठे, हरीश गुजर या पालकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पाहूया ही क्लिप

या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

महेंद्र सूर्यवंशी
तळोदा प्रतिनिधी एम.डी. टी .व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here