चोपडा :५/३/२०२३
चोपडा तालुक्यातील लासूर येथील गरिब कुटूंबात जन्मलेल्या किशोर चौधरी हे बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारत मातेच्या सेवा करण्यासाठी आर्मी मध्ये भरती झालेत.
सोळा वर्षाच्या प्रदिर्घ नौकरी करतांना त्यांनी अनेक संकटातून मार्ग काढत आपल्या परिवाराकडे लक्ष देखील दिले.
किशोर चौधरी यांचे वडिल समाधान चौधरी यांनी कष्टातून आपल्या दोन मुले व एक मुलगी यांना शिकवले.
त्यातून किशोर चौधरी हे लहानपणापासून मनात देश सेवा करण्याची जिद्द असल्याने ते मिलिटरी च्या भरतीत दाखल झाले. सोळा वर्षे नोकरी पुर्ण झाल्यामुळे ते सुखरूप आपल्या मुळ गावी म्हणजे चोपडा तालुक्यातील लासूर येथे सकाळी साडे सात वाजता आले.
म्हणून गावातील श्रीराम भजनी मंडळाने त्यांना वाजत गाजत घरापर्यंत आणले.
तत्पूर्वी त्यांनी बाजार चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला माल्यार्पण करून घरी आले असता त्यांचे ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी गावातील जगत गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बिजोत्सव म्हणून अखंड ज्योत किर्तनी सप्ताह सुरू आहे. आर्मी मधून सेवानिवृत्त झालेल्या किशोर चौधरी यांचा समिती कडून सत्कार देखील करण्यात आला.याप्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आत्माराम पाटील,चोपडा प्रतिनिधी एम. डी. टी. व्ही. न्यूज