शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे शिवजयंती निमित्त किल्ल्याचा देखावा..

0
175

नंदुरबार :११/३/२०२३

नंदुरबार शहरातील बालवीर चौक परिसरात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आकर्षक शिवनेरी किल्ल्याचा देखावा उभारण्यात आला.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन रामदास मराठे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करण्यात आले.
शिवनेरी किल्ल्याच्या देखाव्यानिमित्त शिवप्रेमींच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली.शिवजयंती निमित्त पाळण्यासह महाआरती करण्यात आली.
याप्रसंगी छत्रपती शिवरायांचे गुणगान करणारे पोवाडयांनी परिसर दणाणून गेला.

छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा गगनभेदी घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.

शिवनेरी किल्ल्याची निर्मिती व संकल्पना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, ज्येष्ठ सल्लागार जी. एस. गवळी यांनी साकारली.

नरव्हाळ जिल्हा धुळे येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षल गवळी यांने शिवरायांच्या कर्तुत्वाचे श्लोक सादर केल्याने अंगावर रोमांच उभे राहिले.
शिवपूजन कार्यक्रमास शेतकरी सहकारी संघाचे कर्मचारी जगन खेडकर, सामाजिक कार्यकर्ते बंटी चौधरी, मंडळाचे कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, सदस्य संजय चौधरी, सुदाम हिरणवाळे, सदाशिव गवळी, विशाल हिरणवाळे, भास्कर रामोळे, नंदलाल यादबोले, दीपक गोडळकर, प्रफुल्ल राजपूत, धीरेन हिरणवाळे,डॉ. भुषण पालकडे, मोहन भोई यांच्यासह परिसरातील महिला आणि महाविद्यालयीन युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवीण चव्हाण जिल्हा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here