खोकर गाववासीयांनी उभा केला नवा आदर्श ,हिंदू मुस्लिम एकतेच घडवलं दर्शन ..

0
689

श्रीरामपूर -२२/४/२३

श्रीरामपूर तालुक्यातील खोकर गावात आज ईदच्या नमाज पठणाचा कार्यक्रम शांततेत पार पाडला.
मुस्लिम बांधवांनी महिनाभर खडतर असा उपवास धरून आज दिनांक 22एप्रिल 2023 रोजी हा उपवासाचा शेवटचा दिवस होता .. .

या निमित्ताने नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
यावेळी गावातील श्री बाबासाहेब पाटील काळे व श्री पोपटराव बाबुराव जाधव. श्री ज्ञानेश्वर बाबासाहेब काळे यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी हिंदू- मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांनी शांततेत ईद साजरी केली ..

हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडवलं ..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0


श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी , तात्यासाहेब शेरकर, एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here