शहादा: १९/२/२३
शॉर्ट हेडलाईन
1 सरपंचांच्या हस्ते करण्यात आलं शहाणा गावात जलजीवन मिशन योजनेचं उद्घाटन
2 योजनेअंतर्गत पाण्याची टाकी सिंचन विहीर व बोरवेलची होणार सुरुवात
3 ग्रामस्थांना मिळणार योजनेचा लाभ
केंद्र आणि राज्य शासनाने नुकतंच जलजीवन मिशन आणि हर घर नळ कनेक्शन ही योजना सुरू केली.
शहादा तालुक्यातील शहाणा गावात याचा शुभारंभ करण्यात आला.
पाण्याची टाकी, सिंचन विहीर आणि बोरवेल या तीन प्रस्तावित जागेचं अखेर मुहूर्त लागलं.
गावाचे कारभारी म्हणून सरपंच यांनी या जागेचं उद्घाटन केलं.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य राजू जाधव, पंचायत समिती सदस्य प्रकाश नावडे, सरपंच रवींद्र पाडवी यांच्यासह नरेंद्र भंडारी, राकेश सुळे रवींद्र पाडवी आकाश भंडारी, कुरबान भंडारी, दिलवर पवार, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते..
या योजनेचा शुभारंभ करण्यात आल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं.
निलेश अहेर, नंदुरबार शहर प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज नंदुरबार