विठोबाची वारी झाली डिजिटल… वारकऱ्यांना घरीही करता येणार दर्शन !

0
138

पंढरीचा विठोबा हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत… साध्याभोळ्या वारकऱ्यांसाठी विठू माऊलीचीचे नाम देखील अलौकीक भक्तीची अनुभूती देणारा … आषाढी, कार्तिकीला वारकऱ्यांचा मोठा मेळा चंद्रभागेच्या तीरी विठोबाच्या भेटीला भरतो. आज पासून आषाढीवारीची सुरुवात होत आहे. जगदगुरू तुकोबारायांची पालखी देहूहुन आज पंढरीकडे प्रस्थान करीत आहे. वारीची ओढ प्रत्येक वारकऱ्याला मनात असतेच… मात्र काही कारणांमुळे कधीतरी वारी चुकते. मात्र, आता वारी चुकली तरी घर बसल्या वारीची अनुभूती विठूरायांच्या भक्तांना घेता येणार आहे. कारण यंदा पांडूरंगाची वारी डिजीटल होत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यंदा पालख्यांना जीआरएस कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे विठूरायाच्या भाविकांना केवळ QR कोड आपल्या फोनमध्ये स्कॅन करुन पालखीसोहळा पाहता येणार आहे. भाविकांना फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइनचा QR कोड स्कॅन करून संपूर्ण वारी सोहळा घर बसल्या पाहता येणार आहे.

crt 0w 100

तुकोबारायांच्या पालखीचे आज (दि.१०) रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. उद्या रविवारी ११ जूनला ज्ञानोबांची पालखी आळंदीहुन पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. १२ जूनला संतश्री. तुकाराम महाराज आणि संतश्री. ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालाख्या पुण्यामध्ये एकत्रित येणार आहेत. पालखीमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुणे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

हे सुध्दा वाचा:

महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांसह राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील नवापूरला येणार ! – MDTV NEWS

GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

मुंबई, सोलापूर आणि अहमदनगर दिशेने येणाऱ्या सर्व जड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. पालखी सोहळा सुरू असताना वाहतूक नियमांसाठी पुणे शहरात १०० कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. पालखीचे लाईव्ह लोकेशन जाणून घेण्यासाठी पालखी मधील काही वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवण्यात येणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांच्या पालख्यांचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होत आहे. हजारो वारकरी या पालख्यांसोबत वारीमध्ये सहभागी होत आहेत. यंदा मात्र या वारीला डिजीटलस्वरुप मिळाले आहे. त्यामुळे अखंड महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील विठूरायाच्या भक्तांना घरबसल्या वारीची अनुभूती घेता येणार आहे.

एमडीटीव्ही न्युज ब्युरो, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here