नंदुरबार :- मतदारांनी विश्वास ठेवून सर्व जागांवर उमेदवार विजयी केले आहेत. त्यामुळे आता जास्त जबाबदारी वाढलेली आहे. शेतकरी,कष्टकऱ्यांची सेवा करण्याची पुनश्च संधी मिळालेली आहे. विरोधकांनी पैसा व संपत्तीच्या जोरावर पदाधिकाऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र निकालाच्या माध्यमातून विरोधकांचा प्रयत्न मतदारांनी हाणून पाडला, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट यार्ड्यात शेड बनवण्यात येईल. भाजीपाला लिलाव प्रक्रिया सकाळी पाच व दुपारी तीन वाजता सुरू होईल. स्वतंत्र कांदा लिलावाची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
बाजार समिती निवडणुकीमध्ये शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे १८ पैकी १८ उमेदवार विजयी झाल्यानंतर आमदार कार्यालयाच्या बाहेर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी कार्यकर्त्यांसह डीजेच्या तालावर चांगले थिरकतांना पाहायला मिळाले. आमदार कार्यालयाच्या बाहेर जल्लोष सुरू झाल्यानंतर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी थेट समर्थकांमध्ये गेले. हातात भगवा झेंडा घेत डीजेच्या तालावर ठेका धरला.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी विजयी उमेदवारांच्या सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
प्रवीण पाटील. एम.डी.टी.व्ही. न्युज, नंदुरबार