नंदुरबार : जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलिस दलातर्फे नंदुरबार जिल्ह्यासह शहरात ठिकठिकाणी पाणपोईची सोय केली जात आहे. यामुळे भर उन्हात थकलेल्यांची तृष्णा भागविण्यासाठी या पाणपोईंचा मोठा आधार निर्माण झाला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलिस दलातर्फे नंदुरबार जिल्ह्यात सुमारे ४० पेक्षा अधिक ठिकाणी पाणपोई सुरु करण्यात आल्या आहेत. यामुळे सामान्य जनतेला खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडत असून ४० ते ४२ च्या तापमानात तृष्णा भागविताना पोलिसांना आशीर्वाद देत आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
आज जिल्हा रुग्णालय येथे पाणपोईचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, पोलीस उप अधीक्षक सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच युवारंग फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेन्द्र लुळे, हिरकणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना गोस्वामी, संगीता वाघ आदि उपस्थित होते.
जीवन पाटील. कार्यकारी संपादक, एमडीटीव्ही न्युज नंदुरबार