‘आम्ही विकासाचे वाटेकरी’ : योगेश पाटील यांची शुक्रवारी धुळे आकाशवाणीवर मुलाखत

0
156

धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ‘आम्ही विकासाचे वाटेकरी’ या उपक्रमांतर्गत धुळे येथील समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांची शुक्रवार, दि.२६ मे रोजी सकाळी ८.१५ वाजता आकाशवाणीच्या धुळे 100.5 FM केंद्रावरून मुलाखत प्रसारित होणार आहे. तसेच ही मुलाखत ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरही ऐकता येईल, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी दिली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

या मुलाखतीत श्री. पाटील हे अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, दिव्यांग, तृतीयपंथीयासाठी समाजकल्याण विभागाच्या योजना, शासन शिष्यवृत्ती, आश्रमशाळा, वसतीगृह, आंतरजातीय विवाह, रमाई आवास योजनांसह विविध विषयांची सविस्तर माहिती देणार आहेत.

ही मुलाखत वृत्त निवेदिका संगीता लोखंडे यांनी घेतली आहे. श्रोत्यांनी या मुलाखतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्री.बोडके यांनी केले आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here