महिला दिनी कन्यारत्नांचं स्वागत, ‘स्पर्श’ रुग्णालयाचा उपक्रम..

0
310

नंदुरबार :६/३/२०२३

येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जातो.. त्या दिवशी गरोदर महिलांसाठी एक विशेष मोहीम राबवली आहे ती नंदुरबारच्या स्पर्श नर्सिंग हॉस्पिटलनं..
गरोदर महिलांसाठी मोफत तपासणीसह विशेष मोहीम या हॉस्पिटलला राबवली आहे..

ती अशी की या दिवशी ज्या मातांना कन्यारत्न होईल त्यांचा पूर्ण वैद्यकीय खर्च नंदुरबार येथील स्पर्श नर्सिंग हॉस्पिटलचा ठाकरे दांपत्य करणार आहे..

याबाबत नुकताच डॉक्टर प्रशांत ठाकरे व डॉक्टर प्रीती ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला..

https://bit.ly/3Jh0QW9 : हे हि पहा

हे रुग्णालय धुळे रस्त्यावर असल्याने त्या ठिकाणी रुग्णांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे..

आता या रुग्णालयाचे विरल विहार खोडाई माता रस्ता या ठिकाणी स्वतःच्या वास्तूत स्थलांतर करण्यात आलंय..

महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी ही विशेष संधी असणार आहे..

त्यामुळे एकूणच डॉक्टर प्रशांत ठाकरे आणि डॉक्टर प्रीती ठाकरे हे कौतुकास पात्र ठरत आहे..
प्रवीण चव्हाणसह हिरालाल मराठे एम.डी .टी.व्ही न्यूज प्रतिनिधी नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here