काय आहे 37 (3) कलम..

0
305

जिल्ह्यात सर्वत्र लागू आहे हा आदेश

नंदुरबार :८/३/२०२३

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी मनीषा खत्री यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये 10 मार्च, 2023 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 24 मार्च,2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

16
श्रीमती मनीषा खत्री, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी नंदुरबार

काय आहे आदेश:

मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) मधील अधिकाराचा वापर करुन या आदेशान्वये पुढील कृत्यांना बंदी घालण्यात येते. यामध्ये…

अ) शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया व काठया किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तु घेऊन फिरणे,

ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे.

क) दगड अगर इ. अस्त्रे किंवा शस्त्रे सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे,साधने इ.तयार, जमा करणे,आणि बरोबर नेणे,

ड) कोणत्याही इसमाच्या चित्रांचे प्रतिकात्मक, प्रेताचे किंवा पुढा-यांच्या चित्रांचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करण,

इ) सार्वजनिक रित्या ओरडणे, किंवा विक्षिप्तपणे हावभाव करणे,

ई) सभ्यता अगर नितीमत्ता विरुध्द असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे आणि तशी चिन्हे, चित्रे, फलक, इ.लावणे किंवा इतर कोणतेही असे जिन्नस अगर वस्तु तयार करणे अगर त्यांचा प्रसार करणे या कृत्यांना बंदी घालीत आहे.

वरील कलम 37 (1) अंतर्गतचा हा आदेश ज्यांना हातात लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही. अशा वृध्द अथवा अपंग इसमांना लागु असणार नाही.

त्याचप्रमाणे मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पांच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यांस सबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पुर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास या आदेशान्वये बंदी घालीत आहे. हा आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणूका, प्रेत यात्रा यांना लागु असणार नाही.

सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत.

तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही.

आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रविण चव्हाण एम. डी. टी.व्ही न्यूज नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here