जेव्हा जिल्हाधिकारी जातात बांधावर पाहणीला…

0
159

तळोदा : १४/३/२३

महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात सह विविध भागात अवकाळी पावसाना थैमान माजवलं होतं..

त्यात उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात तळोदा आणि नंदुरबार तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसला.. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि नुकता स्त्रोत आणि नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली.. तर तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देखील अधिकाऱ्यांना पारित केले..

मागील आठवड्यात झालेल्या वादळी पावसाच्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच काल तेरा रोजी पुन्हा गारपीटीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं..

पुन्हा जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि सुमारे तासभर विजांचा कडकडाट सुरू होता काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती समोर येते..

सुमारे 1600 हेक्टर क्षेत्र बाधित झाले ते पंचनामे पूर्ण होत नाहीत तोवर काल सायंकाळी पुन्हा अवकाळी बरसला 14 तालुक्यात काही ठिकाणी गारपीट वादळी पाऊस झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी एम.डी.टी.व्ही.ला दिली..

मेंढपाळ बांधवांचे देखील खूप हाल झालेत..

यासंदर्भात माहिती मिळता जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी 14 आणि नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त भाग गाठले.. पाहणी करून शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली..

अधिकाऱ्यांना या संदर्भात कडक आदेश पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले..

यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्यासमवेत प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, तर उद्याचे तहसीलदार गिरीश वखारे, कृषी अधिकारी नरेंद्र महाले शैलेंद्र गवते आदी उपस्थित होते..

कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्यासाठी पावले उचलावीत असे आदेश जिल्हाधिकारी खत्री यांनी दिले..
*आमदार राजेश पाडवी यांच्या आदेशाने भाजपा पदाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर
बांधावर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांना आमदार राजेश पाडवी यांनी आदेश दिले.. त्यानुसार विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, विठ्ठल वागले ,प्रवीण वाळवी, दारासिंग वसावे ,किरण सूर्यवंशी ,पुंडलिक राजपूत आदी यावेळी उपस्थित होते..
जीवन पाटील कार्यकारी संपादक एम.डी.टी.व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here