तळोदा /29-5-23
तळोदा नगरपरिषद हद्दीत कालिकादेवी मातेचे मंदिर आहे.. अक्कलकुवा रस्त्यावर पन्नास ते साठ वर्षांपूर्वीचा प्राचीन पूल आहे
पण आज त्या मुलाकडे एक नजर टाकली असता त्याची दुरावस्था झाल्याचं दिसून येतं
पुलाला संरक्षण कडे दोन्ही बाजूला नसल्याने परिसरातील नागरिकांच्या जीवाची भीती नाकारता येऊ शकत नाही
मागील पाच वर्षांपासून कठडे बांधण्यात आलेले नाहीत
अवघ्या काही दिवसांवर मान्सून ऋतू येऊन ठेपलाय
पण नगरपालिका आणि प्रशासन पाचवीला पुजलेले
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
विविध संघटनांनी निवेदने देऊन सुद्धा निवेदनांना केराची टोपली दाखवली
नदीला पुराचे पाणी येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही
पुलाच्या त्यापलीकडे नागरिकांची वस्ती असून त्यांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो
नदी जवळील परिसर हा आदिवासी लोकवस्तीचा असून तेथील रहिवासी रोज सकाळी आपल्या दिनचर्यासाठी घरून निघून जातात
घरी असतात ती त्यांची चिमुकली मुले
नदीकाठी आणि पुलावर खेळण्यासाठी ही मुले येतात मात्र त्यांची सुरक्षा रामभरोसे
अशावेळी एखादा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल या भागातून विचारला जातोय
सदरील पुलावर संरक्षण कठले नसल्याने जीवित हानी होऊ शकते म्हणून निवेदनाची गंभीर दखल घेऊन त्वरित संरक्षण कठडे उभारण्यात यावे अशी मागणी निवेदनातून टायगर ग्रुप व परिवर्तन युवा मंच कडून करण्यात आली
निवेदनाची गंभीर दखल येत्या काही दिवसात न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय
त्यामुळे सोमवारचा दिवस तळोदा नगर परिषदेसाठी निवेदनांचा वार ठरला..
विविध संघटना का राजकीय पक्षांनी देखील निवेदने देऊन आपल्या मागण्या लावून धरल्या..
आता तरी प्रशासनाला जाग येईल आणि संरक्षण कठडे या नदीवर उभारले जातील हीच अपेक्षा
या बातमीचा सातत्याने तळोदा तालुका प्रतिनिधी आमचे नितीन गरुड पाठपुरावा करतीलच आणि आमची देखील नजर असणार ती प्रशासनाच्या पुढच्या कार्यवाहीवर..
नितीन गरुड, तळोदा तालुका प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज