तळोदा :१/०३/२०२३
सध्या तळोदा शहरात विविध ठिकाणी पार्किंग झोन फलक नसल्यानं वाहतुकीची समस्या निर्माण झालीय ..
त्यातून वाहनधारक आणि व्यावसायिक यांच्यात वादाला तोंड फुटतांना दिसते ..
शहरात वाढती वाहनांची संख्या व पार्किंगची योग्य सोय नसल्यामुळे लोक आपली वाहने दुकानांच्या समोर कुठेही लावून इतरत्र खरेदीला निघून जात असतात.
त्यामुळे वाहनधारक व दुकानदार यांच्यात नेहमी वाद होताना दिसून येतात.
त्याला मुख्य कारण म्हणजे वाहनधारक आपले वाहन पार्किंग मध्ये किंवा शिस्त पद्धतीने लावत नाही.
रस्त्याच्या मधोमध लावून देतात .
त्यामुळे वाद होताना आपल्याला नेहमीच दिसून येते.
याला उपाययोजना म्हणून संबंधित विभागाने पी वन, पी टू ,पद्धतीने पार्किंगची शिस्त लावणे आवश्यक आहे .
विविध ठिकाणी बोर्ड पार्किंग सूचना फलक लावल्यास वाहनधारकांना वाहन लावण्यास सोपे होईल .
रहदारीस अडथळा येणार नाही .
व दुकानदार आणि वाहनधारक यांच्यात होणारे वाद संपुष्टात येतील .
रस्त्यावर वाहन नसल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही..
बेशिस्त वाहनधारकांवर लगाम लावण्यासाठी ह्या प्रकारचे उपाययोजना संबंधित विभागानं त्वरित केल्यास तळोद्यातील रस्ते आणि त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा घेतील हीच अपेक्षा ..
महेंद्र सूर्यवंशी तळोदा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज