मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतरच आता महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे संकेत भाजप व शिंदे गटाच्या वतीने देण्यात आले आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
या भेटीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या घडामोडी वेगवान झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक आमदार आणि खासदार देखील मंत्री पदासाठी इच्छुक आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिल्ली वारी केली आहे.
या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मंत्रीपदासाठी इच्छुक शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांचे या भेटीकडे लक्ष्य लागले आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राज्यात सत्तांतर झालं त्यानंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी सरकार स्थापन केलं. तेव्हापासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून संजय गायकवाड, मराठवाडा संजय शिरसाट, प. महाराष्ट्र अनिल बाबर, प्रकाश आबिटकर, मुंबई यामिनी जाधव, कोकण योगेश कदम, उ. महाराष्ट्र चिमणराव पाटील, सुहास कांदे, भरत गोगावले, विदर्भ बच्चू कडू , संजय रायमूलकर यांना शिंदे गटाकडून मंत्रिपद मिळू शकते.
तर भाजपाकडून किसन कथोरे, मनीषा चौधरी, रणधीर सावरकर, गणेश नाईक, पश्चिम महाराष्ट्र माधुरी मिसाळ, मराठवाडा मेघना बोर्डीकर, उत्तर महाराष्ट्र जयकुमार रावल, देवयानी फरांदे, संजय कुटे, मुंबई योगेश सागर, किसन कथोरे यांची नावे चर्चेत आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना संधी?
सध्यातील राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला आमदाराचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारवर टीका देखील झाली आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात महिला आमदाराला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही नवोदित आमदार देखील मंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एमडीटीव्ही न्युज ब्युरो, मुंबई