नंदुरबार: २३/२/२०२३
आष्टे ता.नंदुरबार येथे 30 लाभार्थ्यांना कमलेश महाले .उपसभापती तथा सदस्य यांच्या प्रयत्नातून उज्वला गॅस कनेक्शन वाटप करण्यात आलं .
गावातील गरिब आणि गरजु आदिवासी व बेलदार समाजातील महिलांना एच.पी.कंपनी चे सिलेंडर व शेगडी वाटप शिरिषकुमार नाईक, नवापूर विधानसभा मतदारसंघ.व अँड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आलं .
प्रथम मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आ. शिरिष कुमार नाईक म्हणाले कि आपल्या मतदारसंघात मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांचे नियोजन केले आहे.
. अँड राम रघुवंशी यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा आपल्या पर्यत पोहचविण्यासाठी आमची टिम कार्य करत आहे.
आयुष्यमान भारत आरोग्य योजनेची माहिती देण्यात आली..
यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार. सभापती मायाताई माळचे, जेष्ठ नेते बि.के.पाटील.उद्योजक ताराचंद माळचे.धरमेंद्रसिंग परदेशी.संतोष साबळे.सरपंच किसन सोनवणे.ग्रा.प.सदस्य जिरुबाई पवार मिनाक्षी ढोडरे.बाबुलाल कोकणी.आत्मराम खाडे.नरोत्तम पाटील. दत्तात्रय आघाव,
कैलास खंडारे.नथ्थु भिल.बालु पवार.श्रिराम पाटील.सुरेश हेमाडे.धनाकर बांगर.जगन नाईक.मनोज बेलदार.देवेद्र आघाव.लक्ष्मन बांगर.समाधान शेवाळे.धिरज शेवाळे.नारायण ढोडरे.दिनेश आघाव यांच्यासह लाभार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…
उज्वला गॅस कनेक्शन योजना नेमकी काय ?
केंद्र सरकार आपली देशातील गरीब जनतेच्या हितासाठी विविध सरकारी योजना राबवित असते.
त्या योजनांपैकीच एक योजना म्हणजे हि ..
देशात बहुतांश कुटुंब हे दारिद्र रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत.
आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांना गॅस कनेक्शन घेणे शक्य नसते त्यामुळे ते चुलीवर जेवण बनवतात त्यामुळे जंगल तोड केली जाते तसेच चुलीवर जेवण बनवल्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर त्या चुलीच्या धुराचा त्रास होतो व ते दम्यासारख्या आजारांना बळी पडतात या सर्व गोष्टींचा विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी १ मे २०१६ रोजी उज्वला गॅस योजना संपूर्ण भारतात सुरु करण्याची घोषणा केली.
प्रधानमंत्री यांनी आपल्या घोषणेत सांगितले की भारतातील गरीब व दारिद्र रेषेखालील जे कुटुंब आहेत त्यांना या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर दिले जातील.
या योजनेअंतर्गत १४.२ किलो वजनाचा सिलेंडर दिला जातो परंतु डोंगराळ भागात इतक्या भारी वजनाचा सिलेंडर घेऊन जाणे शक्य नसते त्यामुळे शासनाने ५ किलो वजनाचे २ सिलेंडर उपलब्ध करून दिले आहेत.
जे घेऊन जाणे शक्य होईल.या योजनेसाठी केंद्र सरकारकडून १६००/ रुपये दिले जातात या योजनेची महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत दिले जाणारे गॅस कनेक्शन फक्त कुटुंबातील महिलेच्या नावावर दिले जाते.
या योजनेअंतर्गत सर्वात प्रथम ५ करोड कुटुंबांना या योजनेचा लाभ द्यायचा उद्देश होता .
त्याची संख्या वाढवून ८ करोड केली गेली. उज्वला गॅस योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली गेली आहे.
या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याला आपल्या जवळच्या गॅस वितरण केंद्रावर जाऊन या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन साठी अर्ज घ्यायचा आहे.
उज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नवीन नियमानुसार लाभार्थ्याला भरलेला सिलेंडर मोफत दिला जातो.
शासनाकडून गॅस कनेक्शन साठी 800/- रुपये अनुदान दिले जाते.
नारायण ढोडरे नंदुरबार ग्रामीण प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज