नेर : ०५/३/२०२३
कुस्ती हा महाराष्ट्रामध्ये खेळल्या जाणाऱ्या प्रसिध्द खेळांपैकी एक आहे.
कुस्ती हा भारतातील सर्वात जुन्या खेळांपैकी एक आहे.
लोक कुस्तीमध्ये अनेक प्रादेशिक शैली आणि भिन्नतादेशात अस्तित्वात आहेत.
भारतीय कुस्तीपटूंनी फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली आहेत.
कुस्तीपटू परंपरेने लंगोट वापरतात .
महाभारतातील प्रमुख पात्रांपैकी एक , भीम हा त्या काळातील एक महान कुस्तीपटू मानला जात होता .
आणि इतर काही महान कुस्तीपटूंमध्ये जरासंध , कीचक आणि बलराम यांचा समावेश होता.
भारतात कुस्तीला दंगल असेही म्हणतात .
आणि हे कुस्ती स्पर्धेचे मूळ स्वरूप आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये याला कुष्टी असेही म्हणतात.
पंजाब आणि हरियाणामधील कुस्ती गोलाकार कोर्टात मऊ मैदानावर होते ज्याला पंजाबीमध्ये “आखारा” म्हणतात. एकाच्या मागचा भाग (पाठ) जमिनीला स्पर्श करेपर्यंत दोन पैलवान कुस्ती खेळत राहतात.
राजे महाराज्यांपासून ते मुघल साम्राज्य आणि आजपर्यंत कुस्ती हा खेळ खेळला जातो.
पूर्वीकाळी याला ‘मल्ल युद्ध’ म्हणून ओळखल् जायचे. या खेळासाठी दांडग्या शरीरयष्टी सोबतच चपळ आणि तेज बुद्धिमत्तेची गरज असते.
सालाबादप्रमाणे वेळेस देखील देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं..
त्यानिमित्त भव्य कुस्तीची दंगल लोकांनी अनुभवली..
धुळे नंदुरबार जळगाव नाशिक सह विविध कुस्तीगीर मल्ल नेर गावात दाखल झाले होते.
कुस्तीचा सामना जसजसा रंगत गेला तसतसं उपस्थितांच्या प्रमाणात वाढ होत गेली..
काशिनाथ कोळी उर्फ काशिनाथ पैलवान यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम ट्रॉफीचं आयोजन पहेलवान किरण कोळी आणि शिवाजी व्यायाम शाळा यांच्यामार्फत करण्यात आलं होतं.
यासाठी नेर ग्रामपंचायत कडून सहकार्य लाभलं होतं..
मोठ्या उत्साहात कुस्ती दंगल पार पडली..
श्री शिवाजी विजय व्यायाम शाळेचे सर्व सदस्य पोलीस कर्मचारी ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक यांनी हजेरी लावली..
दिलीप साळुंखे धुळे तालुका प्रतिनिधी एम.डी. टी.व्ही न्यूज