जिल्ह्यात १८ हजार ९१८ एकूण मतदार होते .मतदानासाठी जिल्ह्यात एकूण २३ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली.रविवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या निवडणूक विभागाजवळ असलेल्या जागेवरून मतदानाचे साहित्य घेऊन कर्मचारी केंद्रांकडे रवाना झाले.
जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, तसेच अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रांवर एक राखीव मतदान अधिकारी नेमण्यात आले .कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी प्रत्येक केंद्रावर एक पोलिस कर्मचारी देण्यात आला होता .मतदारांमध्ये ५ हजार ७७० महिला तर १३ हजार १४६ पुरुष मतदार व दाेन तृतीयपंथी मतदार यांचा समावेश होता.दुरबार केंद्रात सर्वात जास्त मतदार होते .
उमेदवारांमुळे निवडणूक गाजत असल्याने जिल्ह्यातही माेठी चुरस पहावयास मिळाली .पदवीधर निवडणुकीसाठी केंद्र निहाय मतदारांची संख्या अशी होती -माेलगी केंद्रात ३५७ पुरुष तर ८२ स्त्री मतदार, अक्कलकुवा ६१० पुरुष तर २०६ स्त्री मतदार, अक्राणी ७१५ पुरुष तर १८६ स्त्री मतदार, तळोदा ८९३ पुरुष तर ३५३ स्त्री मतदार, ३५८ पुरुष तर १२९ स्त्री मतदार, रनाळा ४६९ पुरुष तर १७३ स्त्री मतदार, कोळदा ४६० पुरुष तर १२६ स्त्री मतदार, कोळदा ४६९ पुरुष तर १७३ स्त्री मतदार, नंदुरबार ९८४ पुरुष तर ३७२ स्त्री मतदार, ८५३ पुरुष तर ४५५ स्त्री मतदार, ८४७ पुरुष तर ४८३ स्त्री मतदार, ८४१ पुरुष तर ४६६ स्त्री मतदार, ५४३ पुरुष तर २६५ स्त्री मतदार, खांडबारा २७५ पुरुष तर १०७ स्त्री मतदार, विसरवाडी २३२ पुरुष तर ७४ स्त्री मतदार, नवापूर १००२ पुरुष, ४६१ स्त्री मतदारअसे होते .
जिल्हाभरात अशी होती मतदान केंद्रांची व्यवस्था -मोलगी पंचायत कार्यालय, अक्कलकुवा तहसील कार्यालय, अक्राणी येथील तहसील कार्यालय, तळोदा येथे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची उत्तर-दक्षिण इमारतीतील दक्षिणेकडील खोली क्र १, खोली क्र ३, प्रकाशा ग्रामपंचायत, म्हसावद ग्रामपंचायत, शहादा नगरपालिका शाळा क्र ९, खोली क्र ७ व ३, वडाळी ग्रामपंचायत, रनाळे जि.प. मुलांची शाळा खोली क्र ३, कोळदा जि.प. शाळा क्र. २, नंदुरबार येथील श्रीमती हिरीबेन श्रॉफ हायस्कूलची खोली क्र १, २ व ८, साईबाबा सभागृह खोली क्र.५, खांडबारा ग्रामपंचायत, चिंचपाडा ग्रामपंचायत, विसरवाडी ग्रामपंचायत, नवापूर तहसील कार्यालयात अशी २३ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली होती
.नाशिक पदवीधर मतदार संघासाठी मतदानाची चार वाजेची वेळ संपल्यानंतर देखील नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कुलच्या मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा दिसुन आल्या होत्या.मतदानाची अंतीम वेळ उलटुन आता एक तास होत आला तरी याठिकाणी मतदान सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळाले
एमडी टीव्ही न्यूज,प्रतिनिधी नंदुरबार.