शिरपूर – प्रसिद्ध उद्योगपती चिंतनभाई पटेल यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार ..

0
493

हॉटेल हयात सेंट्रिक जुहू येथे आयोजित शानदार कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात आले.महाराष्ट्राचे पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला

महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन आणि प्रवासी संदेश यांनी याच आयोजन केलं होत .कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माजी शिक्षण मंत्री आणि विधान परिषद सदस्य आमदार अमरिशभाई पटेल यांचे सुपुत्र तथा श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कौतुक केले.

image 4

तसेच माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या शिरपूर पॅटर्न रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाने शिरपूर आणि परिसराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगितले. ‘शिरपूर पॅटर्न’ हा प्रकल्प देश आणि जगासमोर आदर्श ठरला आहे, असेही श्री. लोढा म्हणाले.


नवल कढरे – एम डी टीव्ही न्युज शिरपूर तालुका प्रतिनिधी..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here