गुजरात :२४/२/२०२३
गुजरात मध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
सरकार कडक कायदे आणण्याच्या तयारीत आहे
येत्या 15 व्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार यासाठी विधेयक आणू शकते.
यामध्ये परीक्षेतील गैरप्रकार करणाऱ्याला तीन वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड तर प्रश्नपत्रिके फोडणाऱ्याला एक कोटी रुपये दंड आणि दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
विधेयकाची प्रत आमदारांना उपलब्ध करून देऊन त्यावर विचार मंथन सुरू आहे.
*पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार हा कायदा करणार कड़क –
गुजरात मध्ये गेल्या काही वर्षात स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सातत्याने फुटल्याच्या घटना घडत आहेत.
या बाबीची गांभीर्याने दखल घेत राज्यात कायदा करण्याची गरज निर्माण झाली. त्या दिशेने सरकारने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.
याद्वारे परीक्षेतील गैरप्रकारांवर कडक कारवाई केली जाईल.
येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहराज्यमंत्री हर्ष संघवी हे विधेयक सभागृहात मांडतील.
आणि लवकरच सभागृहातून या कायद्याला ग्रीन सिग्नल मिळेल असा आशावाद सूत्रांनी व्यक्त केलाय..
महाराष्ट्रात असे कायदे आणण्याची गरज भासू लागली आहे. त्यामुळं सरकार आपले या कायद्यासाठी आग्रही राहील अशी आशा करू या.
गुजरात अहमदाबाद हून एम.डी.टी.व्ही न्यूज ब्युरो