नंदुरबार : २१/०२/२३
शॉर्ट हेडलाईन
1 नंदुरबार आतील एकलव्य विद्यालयाच्या केंद्रात परीक्षार्थीसह पालकांची झाली भाऊ गर्दी
2 परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी शिक्षकांनी केली कसून तपासणी
3 योग्य सामाजिक अंतर राखून विद्यार्थ्यांची केली बैठक व्यवस्था
इयत्ता बारावीचे वर्ष म्हणजे आयुष्यातील शैक्षणिक प्रवासातील करिअरचा टप्पा..
त्या इयत्ता बारावी अर्थात उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस आज दिनांक 21 पासून सुरुवात झाली. नंदुरबारात परीक्षेचा माहोल पहावयास मिळाला.
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडाव्यात म्हणून नियोजन करण्यात आलं..
बारावीच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थी सोबत पालकांची भाऊ गर्दी बघायला मिळाली..
परीक्षार्थी नक्की विद्यार्थी का त्यांचे पालक असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली होती.
खरंतर विद्यार्थी आणि शाळेचा परिसर आणि त्यांचे शिक्षक हा त्रिवेणी संगमच परीक्षेच्या काळात महत्त्वाचा असतो.. पण आपल्या पाल्याची अवाजवी चिंता मनात धरून पालक देखील आपल्या पाल्याला सोडवण्यास केंद्रावर येतात..
नंदुरबार शहरात कॉपीच प्रमाण अधिकाधिक असल्याने नंदुरबारच्या जिल्हाधिकारी खत्री यांनी अधिक खबरदारी घेत परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वीच विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या..
त्यानंतरच मुलांना वर्गात सोडण्यात आलं..
तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नंदुरबार शहर पोलीस परीक्षा केंद्र बाहेर तैनात करण्यात आल्याच चित्र पाहावयास मिळालं.
नंदुरबार शहर पोलीस वाहतूक पोलीस आणि होमगार्ड यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
त्यामुळे पुढील काळात कुठल्याही अनुचित प्रकार घडणार नाही आणि गैरमार्गांशी लढा या मोहिमेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात आणि शहरात देखील कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडेल अशी अपेक्षा..
नारायण ढोडरे, ग्रामीण प्रतिनिधी नंदुरबार एम.डी.टी.व्ही न्यूज