Nandurbar News – धडगाव तालुक्यातील व म्हसावद पोलिस ठाण्याचे दूरक्षेत्र तोरणमाळ येथील ब्रूमपाडा येथे अंगारशा रावल्या नाईक यांच्या शेतात असलेल्या मक्याच्या
शेतात दीड एकर क्षेत्रात ठिकठिकाणी गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिस अधीक्षक पी आर पाटील यांना मिळाल्यावर शहादा व म्हसावद पोलिसांनी अचानक शेतात छापा टाकून ओल्या गांजाची झाडे जप्त करण्यात आली.
एकूण १३९ किलो ओला गांजाची किंमत सात हजार रुपये किलोप्रमाणे नऊ लाख ७३ हजार रुपये एवढी आहे. संशयित आरोपी कोणसिंग अंगारशा नाईक याला अटक करण्यात आली, तर दुसरा अंगरशा रावल्या नाईक फरार आहे. हवालदार किरण वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसावद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
: हेही वाचा :
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत व म्हसावद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजन मोरे व शहादा नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, अव्वल कारकून राजू गवळे, सहाय्यक उपनिरीक्षक सुनील पाडवी, सहाय्यक उपनिरीक्षक रंचना शिंदे, सहाय्यक उपनिरीक्षक गुलाबसिंग पावरा, हवालदार बहादूर भिलाला, हवालदार रामदास पावरा, भीमसिंग ठाकरे, राकेश पावरा, किरण वळवी, चंदू साबळे, रामसिंग सानेर, योगेश निकुंभ, सचिन तावळे, मीनाक्षी, गावित, मेहली वळवी, प्रवीण पवार यांच्या पथकाने कामगिरी केली.
संजय मोहिते, शहादा