Nandurbar News – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील गोमाई नदीत सोमवारी (ता. 9) दुपारी मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र पदविकेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला प्रतीकेश विश्वनाथ पाटील (वय 20, रा. चिखली, ह.मु. विद्याविहार, ता. शहादा) हा मित्रांसोबत दरा फाट्याजवळील गोमाई नदीतील पांडवलेणी भागात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडला. त्याच्या मित्रांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा: हेही वाचा :
- Shiv Sena Protest Nandurbar: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शिवसेनेत संताप; मुख्यमंत्र्यांना पाठवली ५ हजार १ रुपयांची ‘दिवाळी भेट’..!
- Asaduddin Owaisi On Elon Musk: ‘मोदींचा विरोध करू, पण गोऱ्यांचा हस्तक्षेप नाही!’; ओवैसींचा एलन मस्क यांना थेट इशारा
- Dharmendra Pradhan Resign: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश..!
- Vaibhav Sooryavanshi: 18 चेंडूत अर्धशतक, तरीही मॅन ऑफ द मॅच मयंक यादव का?
- Sonam Wangchuk Fast Ended: सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांचे उपोषण मागे; सरकारने मागण्या केल्या मान्य..!
प्रतीकेशला शासकीय रुग्णालय शहादा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून तपास सुरू होता. प्रतीकेश हा एकुलता मुलगा होता. कुटुंबीयांकडून तरुण मुलाचा मृत्यू झाल्याची वार्ता कळताच शोककळा पसरली.

