Nandurbar News : नंदुरबारमध्ये अवैध गुटखा आणि तंबाखू वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली आहे. शहादा शहरास लागून असलेल्या लोणखेडा बायपास रस्त्यावर नियोजित नवीन बसस्थानकासमोर ट्रक थांबवून त्याची तपासणी केली असता परचुटन मालाच्या आडोशाला सुगंधी मसाला व इतर पानमसाला आढळला.
या कारवाईत पोलिसांनी एकूण १४ लाख ९६ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये आठ लाख ९८ हजार ५६० रुपये किमतीचा सुगंधी गुटखा, पानमसाला आणि सहा लाख रुपयांचा ट्रकचा समावेश आहे.
पोलिसांनी या प्रकरणी भगवान उत्तम बोरसे आणि विल्सन रायरबोर्ड डागोटी (रा. खेतिया, मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईमुळे प्रतिबंधित पानमसाला अवैध मार्गाने विकणाऱ्यांचे धाबे दणदणाले आहेत.
- Maharashtra Expressway – ‘समृद्धी’नंतर महाराष्ट्राला मिळणार ‘पुणे-बंगळूर’ ग्रीन फील्ड…!
- Shreyas Iyer ची प्रकृती चिंताजनक सिडनीतील रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू..!
- देशाचे ५३ वे सरन्यायाधीश कोण ? CJI Gavai यांनी सुचवले मोठे नाव..
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी Maharashtra Schools चा मोठा निर्णय! एक्झाम फॉर्म भरण्यासाठी आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
- सरकारी कार्यालयात ID Card नसेल, तर Government Employee च्या पगार कापणार? मोठा निर्णय
पोलिसांनी कशी केली कारवाई?
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत आणि पोलिस कर्मचारी नवीन बसस्थानकासमोर सापळा रचून होते.
दुपारी चार-साडेचारच्या दरम्यान खेतिया ते शहादा मार्गावर नवीन बसस्थानकासमोर वाहन (एमपी ०९, जीजी ००११) थांबवून ट्रकमधील मालाची खात्री केली असता परचुटन मालाच्या आडोशाला महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधी पानमसाला व तंबाखू चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत असताना मिळून आले. ट्रक (एमपी ०६, जीजी ००११)ची तपासणी केली असता पानमसल्यासह १४ लाख ९८ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल मिळाला.
पोलिसांची कारवाईचे कौतुक
या कारवाईचे जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी कौतुक केले आहे. पोलिसांनी अवैध गुटखा आणि तंबाखू वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या कारवाईचे ते आभार मानत आहेत.
कायमस्वरूपी कारवाईची मागणी
नागरिकांकडून पोलिसांना सतत अवैध गुटखा आणि तंबाखू वाहतूक रोखण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. नागरिकांना आशा आहे की पोलिस या कारवाईला सतत चालू ठेवतील.



