रोजगारासाठी आमचे पुनर्वसन करावे : हातगाडी व्यावसायिकांची मागणी
नंदुरबार : शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर हातगाड्या लावण्यात येतात. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होता. या पार्श्वभूमीवर पालिकेने दि.२१ एप्रिलपर्यंत अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना अतिक्रमणधारकांना दिल्या होत्या. स्वताहून अतिक्रमण न काढून घेतल्यास २४ एप्रिल रोजी अतिक्रमणावर बुलडोझर चालविण्यात येणार होते. मात्र पालिकेना अतिक्रमण धारकांना अजून एक संधी उपलब्ध करून दिली आहे. अतिक्रमण धारकांना पुन्हा नोटीस बजावण्यात आल्या असून यात २४ तासांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील सार्वजनिक रस्त्यालगत केलेले अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणी हातगाड्या लावणे तसेच छोट्या टपऱ्या, ओटे, घराच्या बांधकामाच्या पायऱ्या काढून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सार्वजनिक वापराच्या रस्त्याच्या रुंदी कमी होवून वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होत आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
रस्त्याच्या रुंदीमुळे अपघातांमध्ये देखील वाढ होत आहे. दरम्यान याप्रकरणी विविध नागरिक व संस्थांनी पालिकेकडे अतिक्रमणाबाबत तक्रारी केल्या आहे. यापार्श्वभूमीवर नंदुरबार पालिका प्रशासन आता अतिक्रमण हटविण्याबाबत ॲक्शन मोडमध्ये आली आहे. दि.२४ एप्रिल रोजी अतिक्रमण हटविण्यात येणार होते. मात्र काल पालिका प्रशासनाच्यावतीने अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
सदरच्या नोटीसमध्ये नोटीस प्राप्त झाल्यानंतर २४ तासाच्या आत अतिक्रमण काढून घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच सदरचे अतिक्रमण हटविले नाही तर अतिक्रमीत बांधकाम नगर परिषदेच्यावतीने काढून सदरचे अतिक्रमण निकाषीत करण्यात येईल व होणारा खर्च अतिक्रमण धारकांकडून वसूल करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
अतिक्रमण हटावसाठी पालिकेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी यापूर्वी पाोलिस अधिक्षकांकडे पत्र पाठवून अतिक्रमण हटावसाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. यामध्ये १ पोलिस निरीक्षक, १ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ३ उपनिरीक्षक, २५ पोलिस कर्मचारी व १५ महिला पोलिस कर्मचारी अशा बंदोबस्ताची मागणी १९ एप्रिल रोजी पालिका प्रशासनाने केली आहे. तसेच महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना देखील १८ एप्रिल रोजी पत्र पाठविण्यात आले असून अतिक्रमण मोहीमेदरम्यान विद्युत पुरवठा खंडीत करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अतिक्रमण धारकांकडून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पालिकेची पावती घेत असून त्या आमच्याकडे आहेत. ऐनवेळी आमची जागा हिरावून घेतल्यास आम्ही रोजगार करायचा कोठे? असा सवाल उपस्थित करत पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत आता पालिका नेमकी काय भूमिका घेते ? याकडे लक्ष लागून आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.