धुळ्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसची तपासणी
धुळे :- प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसच्या चालकांची मद्यपाना संदर्भात श्वास विश्लेषक (Breath Analyzer) चाचणी करण्याचे निर्देश परिवहन आयुक्त यांनी दिले होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यानुसार धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथक व शहर वाहतूक शाखा यांनी संयुक्तपणे ५ जून, २०२३ रोजी प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रवासी बसेसच्या २८ चालकांची तपासणी करुन त्यांची श्वास विश्लेषक (Breath Analyzer) व्दारे मोटार वाहन कायद्याअंतर्गत चाचणी करण्यात आली.
या चाचणीमध्ये सर्व २८ वाहन चालक निर्दोष आढळले असुन त्यांचा मद्यपान केल्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे धुळे यांनी दिली आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो धुळे – नंदुरबार