नंदुरबारात कर थकबाकी असलेली ४६ दुकाने सील

0
179

कर न भरल्यास निवासी मालमत्ता सील करणार : पुलकित सिंह

नंदुरबार : एकीकडे अतिक्रम मोहीम सुरु असताना आता पालिकेने कर थकविलेल्या दुकानदारांकडे आपला मोर्चाचे वळविला आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी कर भरण्याबाबत वारंवार नोटीसा देऊन देखील कर भरणा न करणाऱ्या मालकांना ४६ दुकाने सील करून चांगलाच धक्का दिला आहे.

नंदुरबार नगर परिषद हद्दीतील गिरीविहार हाऊसिंग सोसायटीमधील दुकान गाळे, निवासी घरांची तसेच मंगल कार्यालयाची सन १९९६ पासूनची कर थकबाकी असल्याने काल मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या पथकाने सदर गिरीविहार कॉम्प्लेक्समधील ४६ दुकाने सील करण्याची कारवाई केली आहे. नंदुरबार नगर पालिकेची मालमत्ताधारकांकडे एप्रिल अखेरपर्यंत सुमारे १७ कोटीहून अधिकची कर थकबाकी होती. वारंवार मालमत्ताधारकांना नोटीसा देऊन देखील कर भरणा केला नाही. यामुळे आता पालिकेने कर वसुलीसाठी कठोर पाऊले उचलली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ज्या मालमत्ताधारकांचा कर भरणा केलेला नाही त्यांच्या मालमत्ता सील तर काहींच्या जप्त करण्यात येत आहे. या वसुली मोहीमेदरम्यान काल गिरविहिार कॉम्प्लेक्समधील ४६ दुकान गाळे सील करण्यात आले आहेत. नंदुरबार नगर परिषद हद्दीतील गिरविहार हाऊसिंग सोसायटी येथील दुकान गाळे, निवासी घरांची तसेच मंगल कार्यालयाची नगर परिषदेकडे १९९६ पासून येणे बाकी असल्यामुळे वेळोवेळी नगर परिषदेकडून नियमानुसार बील वाटप करण्यात आले आहे. तसेच नोटीस देखील देण्यात आली आहे. सदर दुकान गाळ्यांचे संपूर्ण मालमत्ता कर, दंड, नोटीस व व्याजासह तसेच वाहन भाडे जप्ती मोहीमेअंतर्गत झालेला खर्च कर जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत सदर दुकान गाळे सीलबंद राहतील अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.

निवासी मालमत्ता यांचा कर भरणे आवश्यक असून कर न भरल्यास निवासी मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी तथा प्रशासक पुलकीत सिंह यांनी दिला आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here