पोलिसांना हिसका देऊन संशयित फरार

0
260

पूर्वनियोजित कटात चारचाकी वाहनाचा वापर

नंदूरबार :- चारचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता तो नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांना हिसका देऊन न्यायालय परिसरातून सिने स्टाईल पसार झाला.

ADVERTISEMENT

शहादा पोलीस ठाण्यात कलम ३७९ अंतर्गत अटक करण्यात आलेला संशयित ओमप्रकाश उर्फ ओसाराम जाट सरणेम लेहा ( रा. बायतु राजस्थान ) यास पोलिसांनी अटक केली होती. त्यास काल दुपारच्या सत्रात शहादा न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असता पोलिसांना संशयिताने हिसका देऊन फोर व्हीलर गाडीत बसून फरार झाला. पूर्वनियोजित प्लॅन असल्याने आधीच एक चारचाकी वाहन कोर्ट आवाराबाहेर थांबले होते.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

संशयित पोलिसाना हिसका देऊन गाडीच्या दिशेने भरधाव वेगाने पळाला होता. गाडी चालक पळण्याचा उद्देशाने गाडी सुरू करून ठेवली होती. चालत्या गाडीत आरोपी बसला व गाडी सुसाट वेगाने चित्रपट मधील एखाद्या सीन प्रमाणे डोंगरगाव रोडाकडे निघाली. यावेळी पोलिसांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही.

फरार होण्यासाठी ज्या गाडीचा वापर केला त्या गाडीला नंबर प्लेट नसल्याने गाडी कुठली कोणाची समजू शकले नाही. तर या गाडीने दुचाकीला धडक दिली यात सुरेश कानजी चौधरी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शहाजादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here