शरद पवारांच्या राजीनाम्यास ४९ टक्के लोकांची “ना”

0
154

मुंबई:  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे बहुतांश लोकांचे मत असल्याचे सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असे एकूण ४९ टक्के लोकांचे मत आहे. याशिवाय ३३ टक्के लोकांनी आपला निर्णय मागे घेऊ नये असे म्हटले आहे. त्याचवेळी १८ टक्के लोकांनी ‘माहिती नाही’ असे उत्तर दिले.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. सध्यातरी खासदार सुप्रिया सुळे यांचेच नाव आघाडीवर आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या तर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे अजित पवारांकडे येतील, असे चित्र असून पक्षातील काही नेतेमंडळींनी त्याला दुजोरा दिला आहे. 

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे यांचीही नावे पक्षाध्यक्षपदासाठी पहिल्या दिवशी चर्चेत होती. मात्र, पटेल आणि तटकरे यांचे नेतृत्व सगळ्यांना मान्य होणार नाही. तसेच आपल्याला अध्यक्ष होण्यात रस नसल्याचे पटेल यांनीही स्पष्ट केले आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे आले तर त्यावर पक्षात सहमती  होऊ शकेल, असे राष्ट्रवादीतील एका नेत्याने ‘प्रसारमाध्यमा’शी बोलताना सांगितले. मात्र याचदरम्यान सी-व्होटरने महाराष्ट्रात सर्वेक्षण केले आणि लोकांना विचारले की पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा का? या प्रश्नावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा का?

  • होय- ४९ टक्के
  • नाही- ३३ टक्के
  • माहिती नाही- १८ टक्के

शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे बहुतांश लोकांचे मत असल्याचे एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असे एकूण ४९ टक्के लोकांचे मत आहे. याशिवाय ३३ टक्के लोकांनी आपला निर्णय मागे घेऊ नये असे म्हटले आहे. त्याच वेळी, १८ टक्के लोकांनी ‘माहिती नाही’ असे उत्तर दिले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

दरम्यान, अध्यक्ष निवडीसाठी नियुक्त केलेली समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असे आश्वासन शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिले आणि आंदोलन थांबवण्याच्या सूचना केल्या.

राष्ट्रवादीमध्ये दुसऱ्या दिवशीही वेगवान घडामोडी घडल्या असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नाराजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आव्हाड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे चर्चेत होते.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here