नंदुरबार जि.प.च्या ६० शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती..

0
370

नंदुरबार: नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ६० शिक्षकांना [ 60 TEACHER ]मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

यामुळे गेल्या अनेक दिवसापासून पदोन्नतीचा प्रलंबित प्रश्न निकाली निघाला आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभागांतंर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या मुख्याध्यापकपदी पदोन्नतीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून रखडला होता.

जि.प.च्या सर्वसाधारण सभांसह विविध बैठकांमध्ये सदस्यांकडून सदरचा प्रश्न निकाली लावण्याची मागणी देखील सातत्याने करण्यात येत होती.

त्यानंतर शिक्षण विभागाने कालअखेर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षक तसेच पदवीधर शिक्षकांना सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी दि.२० एप्रिल रोजी आयोजित पदोन्नती समितीच्या बैठकीत मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे.

याहा मोगी सभागृहात समुपदेशन शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.युनूस पठाण व निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस.पी.जाधव व सतिष गावीत तसेच वरिष्ठ सहाय्यक मिलिंद जाधव व उमेश पाटील, कनिष्ठ सहाय्यक परेशकुमार वळवी, सुनिल गिरी, प्रशांत गोसावी व स्वप्निल पाटील, संगणक चालक आसिफ पठाण व योगेश रघुवंशी कार्यालयीन कर्मचारी शितल भदाणे यांनी परिश्रम घेतले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत पदोन्नती मुख्याध्यापक संवर्गाच्या रिक्त असलेल्या ६७ पदांपैकी नंदुरबार तालुक्यात १०, नवापूर तालुक्यात ४, शहादा तालुक्यात २२, तळोदा तालुक्यात १०, अक्कलकुवा तालुक्यात ९ व धडगांव तालुक्यात ५ अशी एकूण ६० रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबवुन पसंतीने पदस्थापना देण्यात आली. सदर पदोन्नती प्रक्रिया पारदर्शकरित्या राबविण्यात आल्याने शिक्षकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

जीवन पाटील. कार्यकारी संपादक, एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here