राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावातील खेळाडूंसाठी एक मोठी संधी उपलध करून दिली आहे. जिल्ह्यात उत्कृष्ट क्रीडापटू घडावेत यासाठी जिल्ह्यात उत्तम दर्जाचे विभागीय क्रीडा संकुल उभे रहावे, यासाठी त्यांनी मेहरुण येथे तब्बल ३६ एकर जागा मंजूर केली आहे. ना.महाजनांकडून जिल्ह्यातील क्रीडापटूसाठी ही मोठी भेट असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या या विभागीय क्रीडा संकुल उभारण्याच्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते म्हणाले, या क्रीडा संकुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून या जमीन प्रस्तावास जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या मार्फत मंजुरी देण्यात आली आहे.
हे सुध्दा वाचा:
GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS
महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांसह राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील नवापूरला येणार ! – MDTV NEWS
BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS
खेळाडूंना उत्तम सोईसुविधा उपलब्ध असणारे मेहरुण येथे ३६ एकर जागेवर प्रस्तावित विभागीय भव्य व अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून जळगाव तसेच खानदेशातील आसपासच्या जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन मिळणार आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
खेळाडूंना सराव करण्यासाठी हे शासकीय क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांचे खेळाडूं सराव करतील. त्यांनी केलेला सराव, अद्ययावत साधन सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शक यामुळे याभागातील खेळाडू विविध स्पर्धेत यशस्वी होऊ शकतील, असे महाजन यांनी सांगितले. लवकरच बांधकामासाठीची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ३६ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलात विविध खेळाची मैदाने, धावपटूसाठी ट्रॅक, बास्केटबॉल, हॉलीबॉलसाठी मैदान, टेनिस कोर्ट आदींसह खेळाडूंना लागणाऱ्या सोई सुविधांसह तज्ञ प्रशिक्षक उपलब्ध राहणार आहे.
एमडीटीव्ही न्युज ब्युरो, नंदुरबार.