Jalgaon News…”या” शाळेचा झळकला माहितीपट मिपाच्या पोर्टलवर ..!

0
453

जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हा परिषद शाळांचा भौतिक सुविधा व गुणवत्ता विकासासाठी राबवलेल्या उपक्रमातून प्रेरणा घेऊन पिंपळकोठे शाळेतील शिक्षक डॉ. भदाणे यांनी स्वखर्चातून गणित प्रयोगशाळेची उभारणी केली आहे. यात टेबल, खुर्ची व भिंतींचा वापर शैक्षणिक साहित्य म्हणून केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञानासाठी ही प्रयोगशाळा उपयुक्त ठरणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

डाएटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे व प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक दीपक पाटील व डॉ. पाटील यांनी हा उपक्रम डाएटमार्फत मिपा (औरंगाबाद) येथे सादर केला होता.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEWS

३५ जिल्हे व २३ महापालिका क्षेत्रातील प्रत्येकी पाच निवडक उपक्रमांद्वारे राज्यातून जळगाव, अहमदनगर, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांतील चार शाळांची निवड व्हिडिओ चित्रीकरणासाठी झाली होती. डॉ. प्रदीप भदाणे यांनी प्राचार्य डॉ.वाय.एच.सनेर यांच्या मार्गदर्शनाखाली गणित प्रयोगशाळा विषयावर संशोधन केले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

त्या विषयावर त्यांनी पीएच.डी.मिळविली आहे. संशोधन कार्यात व प्रयोगशाळा उभारणीच्या कामात डाएटचे अधिव्याख्याता डी.बी.साळुंखे, सी.डी.साळुंखे, सुचेता पाटील, डॉ.विद्या बोरसे, शैलेश पाटील, विजय पवार (उपशिक्षणाधिकारी), एस.पी.पवार, कविता सुर्वे, व्ही.एच.पाटील, डॉ.भावना भोसले, एन.एफ.चौधरी, सी.एम.चौधरी, जे.डी.पाटील, करुणा देवकर यांचे योगदान आहे.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEWS

डॉ. भदाणे हे नगाव (ता. धुळे) येथील आहेत. ते ॲक्टिव्ह टीचर म्हणून खानदेशात ओळखले जातात. त्यांची प्रयोगशाळा बघण्यासाठी राज्यातून अभ्यासक येतात. ते नगाव येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करतात. गुणगौरव समारंभातून ते प्रेरणा देत असतात.

सतीश पाटील. भडगाव प्रतिनिधी, एमडी.टीव्ही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here