नंदुरबार :२७ /२/२०२३
आज विवाह सोहळा म्हटलं की अमाप आर्थिक खर्च उभा राहतो आणि त्याचा आर्थिक भार पडतो तो वधू कन्येच्या वडिलांच्या खांद्यावर ..
यातच विविध परंपरांचा स्वीकार करावा लागत असतो.
या परंपरांना फाटा दिली गुजर समाजातल्या समाजकन्यांनी..
नुकताच नंदुरबार शहर गुजर समाज मित्र मंडळाच्या वतीने समाज बांधवांचा चर्चासत्र घेण्यात आलं..
त्यात विविध मान्यवरांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केलं होतं.
माता-भगिनींसह युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाज आणि समाजातील युवा वर्गाने ठरवलं तर समाज परिवर्तन घडू शकतं हे सिद्ध केलं गुजर समाजानं..
विवाह समारंभासाठी असलेल्या अनिष्ट चालीरीती बंद करून नवीन पायंडा या समाजाने इतरांसमोर उभा केला.
प्री वेडिंग रिंग सेरेमनी मेहंदी कार्यक्रम रद्द करून समाजबांधील नियमात लग्न करण्याचा निर्णय कोरीट येथील समाजकन्यांनी नंदुरबार येथील श्रीराम कॉलनी येथील साध्या पद्धतीने लग्न करण्याची शपथ घेणाऱ्या युवकांनी आपलं उदारभावना दाखवली..
तरुणांनी घेतलेले या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतंय.
त्यासाठी त्यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला.
या चर्चासत्रात मनोज पटेल राहणार मामाचे मोहिदे, किरण पटेल राहणार चिचोदा, मधुकर पटेल राहणार ब्राह्मणपुरी, ईश्वर पटेल राहणार सारंगखेडा, बन्सी पटेल धर्मदास पटेल राहणार चिचोदा आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला..
एकूणच विविध चालीरीती बंद करून समाजबांधील नियमात लग्न करण्याचा निर्णय घेऊन या समाजातील तरुणींनी नवा आदर्श उभा केला..
आणि साध्या पद्धतीने लग्न करून शपथ घेतली ती श्रीराम कॉलनी येथील या युवकांनी..
त्यामुळे या तरुण वर्गाचं अभिनंदन आणि कौतुक..
राकेश पटेल चौपाळे प्रतिनिधी एम.डी .टी.व्ही न्यूज