नंदुरबार : २३/३/२३
शहरातील कवराम चौकात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांकडून पोलिसांना चाव्याचा गुच्छ व स्क्रू-चावी मिळून आली आहे.
नंदुरबार शहरातील कवराम चौकात चंद्रकांत उर्फ दुर्गेश वाडेकर (वय १९, रा.बाटली कारखान्यासमोर, वाघोदा ता.नंदुरबार) हा रात्री ११.३० वाजेच्या सुमारास चोरी करण्याच्या उद्देशाने आढळून आला.
पोलिसांना त्याच्याकडे एक स्क्रू-चावी व चाव्यांचा गुच्छा मिळून आला.
याबाबत पोहेकॉ.फुलसिंग नोवाजा पाडवी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात दुर्गेश वाडेकर याच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोहेकॉ. किशोर वळवी करीत आहेत.
जीवन पाटील,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार