नंदुरबार : दि.१० फेब्रुवारी २०२३
मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा गावाजवळ नुकतंच बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येते.
खैरवे येथे मुक्काम राहणारी बस सारंखेडा ते शहादा रस्त्यावर सप्तशृंगी पेट्रोल पंपाजवळ या बसने उसाने भरलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच 39 ए जे 27 98 या जोरदार धडक दिली.. हा अपघात इतका भीषण होता की या बस मध्ये असलेले चालक वाहक यांच्यासह 21 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे.
हि पहा बातमी सविस्तर ⤵️ https://youtu.be/wX79u4EBeow
या विद्यार्थ्यांना उपचार अर्थ शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. घटना घडल्यावर प्रथमतः प्राथमिक आरोग्य केंद्र सारंगखेडा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलं मात्र पुढील उपचारार्थ शहादा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलं.
शहादा ग्रामीण रुग्णालयात या जखमींवर उपचार सुरू आहेत. सारंखेडा गावातील सरपंच गावातील नागरिक वेळीच धावून आले आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केलं. या अपघाता संदर्भात पुढील तपास सारंगखेडा पोलीस करीत आहे .
संजय मोहिते एमडीटीव्ही न्यूज प्रतिनिधी शहादा