तळोदा 4/6/23
4 जून वेळ होती सकाळचे 10..
वादळी वाऱ्याने अचानक रौद्ररूप धारण केलं..
आणि एकच पळापळ सुरू झाली
नियतीला काहीतरी वेगळच मंजूर होतं
तळोदा तालुक्यातील प्रतापूर येथील राजेंद्र रोहिदास मराठे वय वर्ष 42 यांचा एका नैसर्गिक अपघातात जागीच मृत्यू झाला
तळोदा शहराहून एक किलोमीटर अंतरावर चिनोदा रोडवर एक भले मोठे वडाचे झाड आहे..
वाऱ्याचा वेग इतका जोरात होता की त्या वडाचे झाड त्यांच्या गाडीवर कोसळलं..
आणि पाहता पाहता होत्याचं नव्हतं झालं
त्यांच्या मालकीची जी जे शून्य सहा जेई 0541 या आर्टिगा गाडीवर झाड कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला..
चिनोदा प्रतापूर रांजणी गावातील ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढला..
ही बातमी वाऱ्यासारखी प्रतापूर गावात पसरली.. आणि या दुःखद घटनेविषयी सर्वत्र शोक व्यक्त करण्यात आला..
कुटुंबियांनी तर एकच टाहो फोडला
या रस्त्याच्या दुतर्फा घनदाट मोठी आणि जीर्ण झाड आहेत
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सदर वृक्ष काढून टाकण्याविषयी चिनोदा गावकऱ्यांनी वन विभागाला याविषयी वारंवार निवेदन दिली
मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून आलं.. आणि त्याचा बळी ठरले या घटनेत राजेंद्र मराठे
अखेर त्यांना आपला प्राण गमवावा लागला
वृक्षतोड करू नये असं सांगितलं जातं परंतु अशी काही वृक्ष आहेत जी माणसांचा जीव घेऊ शकतात वृक्ष तोडणे काही गुन्हा नव्हे
परंतु या घटनेने पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली आहे
सदर घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांच्यासह तहसीलदार गिरीश वखारे भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी निसार मकरानी यांनी घटनास्थळी धाव घेतली
आणि योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देत मदतीचा हात दिला
नितीन गरुड ,तळोदा ग्रामीण प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज..