अखेर खुन्याच्या गुन्ह्यातील ‘हा ” आरोपी अडकला पोलिसांच्या जाळ्यात..

नंदुरबार :१३/३/२०२३

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी नवीन वर्षाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यचा गुन्हे आढावा घेतला असता नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठणे हद्दीतील गुन्हृयांमध्ये आरोपी अटक झालेले नसुन ते गुन्हा घडले पासुन अद्याप पावेतो फरार आहेत.

ADVERTISEMENT

असे निदर्शनास आल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी फरार पाहिजे व फेर अटक आरोपी पकडणेकामी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेमधील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांचे स्वतंत्र पथक स्थापन करुन विशेष मोहिम राबविणे बाबत सुचना दिल्या होत्या.

फत्तेसिंग बाबजी मावची रा.तिनटेंबा ता.नवापुर जि. नंदुरबार याचे विरुध्द् नवापुर पोलीस ठाणे गु.र.नं. 20/1984 भा.द.वि. कलम 307 प्रमाणे दिनांक 12/02/1984 रोजी गुन्हा दाखल होता.

SPONSORED CONTENT

गुन्हा दाखल झाल्यापासून आज पावेतो 39 वर्षापासून आरोपी फत्तेसिंग बाबजी गावीत हा फरार होता.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दिनांक 13 मार्च 2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नमुद गुन्हयातील फरार आरोपी फत्तेसिंग बाबजी मावची हा व्यारा शहरातील एका कापड मिलमध्ये मजुरीला असून तो त्याची पत्नी व तिन मुलांसह गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील आमली पोस्ट वझरदा ता. सोनगढ येथे वास्तव्यास राहात असल्याची माहीती मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना सांगितली.

नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी यांनी सदर बातमीची खात्री करुन फरार आरोपी अटक करणेकामी नवापूर पोलीस ठाण्याचे एक पथक तात्काळ गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात रवाना केले.

नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील व्यारा शहर गाठून तेथे फरार आरोपी फत्तेसिंग बाबजी मावची याचा शोध घेण्यास सुरुवात केली, परंतु आरोपी हा 39 वर्षापासून फरार असल्याने त्याचा फोटो किंवा इतर माहिती पथकाकडे नव्हती तसेच तो सहज कोठे बाहेर येत नाहीत व आपले अस्तित्व लपवून वेषांतर करुन फिरत होता. त्यामुळे त्यास ओळखणे कठीण झाले होते.

नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाला आरोपीताबाबत इत्थंभूत माहिती काढण्यात पथकाला यश मिळाले व नमुद आरोपी हा व्यारा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.

नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने व्यारा रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावून त्याचा शोध घेत असतांना त्याठिकाणी सुमारे 60 ते 65 वर्षाचा एक इसम फिरतांना दिसला.

पथकाने त्या इसमाला आवाज देताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला म्हणून नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाला संशय आल्याने त्यास पोलीसांनी त्यास पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतास त्याचे नांव गाव विचारले असता त्याने फत्तेसिंग बाबजी मावची रा. तिनटेंबा ता.नवापुर जि. नंदुरबार ह.मु.आमली पोस्ट वझरदा ता.सोनगढ जि. तापी राज्य गुजरात असे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेला आरोपी हा हा वरील गुन्हयातील फरार आरोपी असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.

39 वर्षापासून फरार आरोपीतास बेड्या ठोकून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पथकास नंदुरबार जिल्ह्याचे पेालीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकास 10 हजार रुपये रोख बक्षिस जाहीर केले.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली नवापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उप निरीक्षक अशोक मोकळ, दादाभाऊ वाघ, नितीन नाईक, सुनिल निकम यांच्या पथकाने केली आहे.

प्रविण चव्हाण एम. डी. टी.व्ही न्यूज नंदुरबार..

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here