क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यावर कारवाई करावी

0
197

नंदुरबारात निषेध व्यक्त ; रिपाई युवा आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

नंदुरबार : एका वेबसाईटवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपाई ( आठवले गट ) कडून करण्यात आली आहे. याबाबत रिपाई आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील व पदाधिकाऱ्यांनी नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना निवेदन दिले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या जननी आहेत. भारताच्या प्रथम महिला शिक्षिका आहेत. स्त्रियांना, मुलींना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. मुलींच्या तथा वंचित समाजातील वर्गासाठी त्यांनी शाळा बांधल्या. शिक्षण वर्जित असलेल्या समाज घटकांना शिक्षण देत असताना तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड-धोंडे, शेणाचे, मातीचे प्रहार त्यांनी आपल्या अंगावर घेतले.

हे सुध्दा वाचा:

संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमास बंदी करावी ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – MDTV NEWS

BIG BREAKING… मान्सूनचा प्रवासात चक्रीवादळाचा खोडा ! – MDTV NEWS

साक्षी हत्याकांडतील आरोपींवर तात्काळ कारवाई करा – MDTV NEWS

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

महिलांना मोफत शिक्षण दिले, समाजातील विषमता अनिष्ट चालीरीत कर्मकांड, बालविवाह विरोध व विधवा विवाहाच्या पुरस्कार केला. अशा कर्मवीर महान महिला समाज सुधारक विरोधात काही मनुवादी वृत्तीच्या लोकांनी एका वेबसाईटवर आक्षेपार्ह व अतिशय अपमानकारक मजकूर प्रसारित केला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

या वेबसाईटचा व लेखकाचा नंदुरबार जिल्हा आरपीआय ( आठवले ) युवक आघाडीच्या वतीने जाहीर निषेध नोंदवित असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या संतापजनक प्रकारामुळे बहुजन समाजाच्या तीव्र भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल शासन, प्रशासनाने या प्रकारची गांभीर्याने दखल घ्यावी, इंडिका टेल्स या वेबसाईटवर बंदी आणावी तसेच लेखका विरोधात कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी रिपाई युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here