तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे ..

0
170

शिंदखेडा /धुळे -१७/५/२३

१५ मे पासून शेतकऱ्यांचा विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व आच्छी येथील शेतकरी रावसाहेब ईशी यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
तापमानाची तिव्रता लक्षात घेऊन तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी संबंधित विषय बाबत अधिकारी यांना बोलावून बैठक घेतली
त्यात आपल्या स्तरावरील मागण्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले.
त्यांनतर तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या लेखी आश्वासनाने सदरील सुरू असलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीच मागे घेण्यात आले. संबंधित विषयाच्या विभागातील अधिकारी व प्रतिनिधी यांची बैठकीत तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बाबतीत त्याचबरोबर डीपी वेळेवर मिळणेबाबत वीज जोडणी सक्तीची वसुली, शासनाचा उत्पन्न दुपटीवरील उपक्रमाचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही.


शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळेवर व बिना लिंकिंग खत उपलब्ध करावे.
प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या विविध अडचणी व शेतकऱ्यांना प्रशासनाच्या समन्वय साधून त्यांना लाभ प्राप्त व्हावा आपला तालुका दुष्काळग्रस्त असूनही पोखरा योजनेत आपला समावेश करण्यात यावा
जेणेकरून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ आपल्या कृषी उन्नतीसाठी करता येईल
नरडाना एमआयडीसी चे शिक्के काढण्याबाबत , शेतकऱ्यांचा विहिरींना तात्काळ मंजुरी देऊन निधी मंजूर करावा व तो उपलब्ध करून द्यावा
त्याचबरोबर तापी काठावरील शेतकऱ्यांना पाईपलाईन साठी रोजगार हमी योजनेत समावेश करून द्यावा
पिक विमा देताना शेतकरी हा निकष ठेवून शेतकऱ्याला तात्काळ पिक विमा नुकसान भरपाई उपलब्ध व्हावी व पिक विमा मधून मंडळ ही अट काढून घेण्यात यावी
पीक कर्ज शेतकऱ्यांना सुलभतेने उपलब्ध व्हावे व सिबिल स्कोर ची अट काढण्यात यावी

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
विखरण येथील प्रकल्पाबाबत शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी
वाडी शेवाळी येथील पाठचारी मुळे पांझरत असलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचा नुकसानीचा मोबदला त्यांना देण्यात यावा
प्रकाशा बुराई योजना तात्काळ सुरू करण्यात लिफ्ट इरिगेशन योजना पुन्हा सुरू करण्यात यावी
बेटावद येथील केटीवेअर दुरुस्त करून अजंदे येथील पाठचारीचे काम करण्यात यावे
याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली
बैठक संपल्यानंतर तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या हस्ते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णाभाऊ सोनवणे व आच्छी येथील शेतकरी रावसाहेब सैंदाणे ( ईशी ) यांना लिंबू सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक सुनील भाबड उपस्थित होते.
आपल्या भावना व्यक्त करताना उपोषणकर्ते शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की, जर शेतकऱ्यांचा मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर पुढील आंदोलन केलं जाईल व सदर विषयांच्या विभागांचा सतत पाठपुरवठा सुरू राहील..
याप्रसंगी गोरख सोनवणे माजी सरपंच महेंद्र पाटील ,आर आर पाटील, चंद्रसिंग ठाकूर, सागर देसले, नंदकिशोर पाटील, अनिता गिरासे, ज्ञानेश्वर कोळी उपस्थित होते..
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here