नवापूर : खोकसा धरणात आढळला तरुणाचा मृतदेह

0
403

नंदुरबार :- साक्री तालुक्यातील मालदीपाडा येथून १४ मे पासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा नवापूर तालुक्यातील खोकसा धरणात मृतदेह आढळून आला आहे.

सदर इसम पाण्यात बुडाल्याने त्याचा एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत विसरवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील खोकसा धरणात दि. १६ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसून आला. खोकसा गावाचे पोलिस पाटील सुनिल गावित यांनी याबाबतची माहिती विसरवाडी पोलिसांना दिली. विसरवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण वळवी, पोलीस कॉन्स्टेबल लिनेश पाडवी, देवेंद्र हिरे, अतुल पानपाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून स्थानिकांच्या मदतीने धरणात तरंगणारा मृतदेह बाहेर काढला.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सदर घटनेत मयत व्यक्ती बाबत अधिक चौकशी केली असता साक्री तालुक्यातील मादलीपाडा येथील रहिवाशी दिवाणजी विर्‍या साकळे असे त्या मयत व्यक्तीचे नाव समजले आहे. दि.१४ मे पासून सदरील मयत व्यक्ती हा घरातून निघून गेला होता. दरम्यान त्याचा खोकसा धरणात बुडाल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत विसरवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here